पिंपरी : पिंपरी – चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या. त्यात आता आणखी एक घटना समोर आली आहे. बुधवारी २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नवी सांगवी परिसरात गोळ्या झाडून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दीपक कदम असे त्या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. हत्या केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी – चिंचवड शहरातील नवी सांगवी या गजबजलेला परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ सुरू असते. या ठिकाणी दीपक हा तरुण उभा होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. अचानक फायारिंग झाल्याने त्याला पळायला देखील संधी मिळाली नाही. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या हल्ल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्याचं काम सुरू आहे.
सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याने काही प्रमाणात या भागात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. पूर्व वैमस्यातून ही हत्या झाली का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. भररस्त्यात सराईत गुन्हेगाराचीच हत्या झाल्याने परिसरासह शहरातही एक चर्चा असून खळबळ उडाली आहे.

पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला चाप बसवण्याचं काम पोलिसांकडून केलं जाणं गरजेचं आहे. पिंपरी – चिंचवडसह अशा हत्या, हल्ल्यांच्या घटना पुणे शहरात देखील मोठ्या संख्येने होत आहेत. पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसत असून त्यावर कारवाई होणं महत्त्वाचं आहे.