धक्कादायक, सुपारी होती फक्त हातपाय तोडण्याची, पण आमदारांचा मामा असल्याचे समजल्यावर हत्या

Pune Satish Wagh Murder Case: पुणे शहरातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा तपास सुरु आहे. सुरुवातीला असलेले खंडणीचे हे प्रकरण सतीश वाघ यांच्या पत्नीपर्यंत गेले. पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचे सांगितले गेले. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. आता या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने सुपारी फक्त हातपाय तोडण्याची दिली होती. परंतु हल्लेखोरांना जेव्हा समजले सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहे, तेव्हा त्यांनी हत्या केली.

सतीश वाघ हत्याकांडत नवा खुलासा

सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीतून सतिश वाघ खून प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

ठरले असे अन् केले असे

सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करत होते. तसेच घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीला सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हात पाय तुटल्यानंतर ते घरात बसतील, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील, असे मोहिनी वाघ यांना वाटले. नवरा अपंग झाला म्हणजे आपल्याला त्याला सांभाळता येईल असा विचार म्हणून मोहिनी वाघ हिने हा प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)