येत्या मंगळवारी म्हणजेच चार जूनला सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकांची मतमोजणी नेमकी किती वाजता सुरु होणार, निवडणुकीचा पहिला कल हाती कधी येणार, याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीचा पहिला कल सकाळी नऊ वाजता हाती येणार आहे. सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरु होईल. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएममधून मतमोजणी होईल. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी नऊ वाजता जाहीर होईल, अशी माहिती डॉ. ईटनकरांनी दिली. त्यानंतर एकामागून एक फेऱ्या पार पडतील आणि संपूर्ण मतमोजणीनंतर संबंधित लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार जाहीर होईल. प्रत्येक फेरीनंतर मतांची आकडेवारी समोर येईल, त्यामुळे मताधिक्यावरुन साधारण अंदाज लावता येऊ शकतो.
पुण्यात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २१, तर बारामतीमध्ये सर्वाधिक २४ फेऱ्या खडकवासला आणि भोर मतदारसंघात होणार आहेत. त्या पाठोपाठ शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरूरमध्ये २७ आणि हडपसरमध्ये २६ फेऱ्या होणार आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दरम्यान, मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्रात कुणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणी केंद्राच्या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा असेल, मतमोजणी केंद्राच्या परिसरातही कुणालाच जल्लोष करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना ईटनकरांनी दिल्या आहेत.