आता काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यावर अनेक जण काही संकल्प करतात. तर काहीजण नवीन वर्षाचे स्वागत म्हणून पार्टी करतात. नवीन वर्षात तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही बदल करू शकता. हे बदल केल्यामुळे तुमच्या घरातले दुःख, दारिद्र्य संपुष्टात येऊन घरात सुख-समृद्धी येईल. नवीन वर्ष सुरू होताच लोक अनेक प्रकारच्या योजना आखतात. ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात पूर्ण होऊ शकल्या नाही त्या नवीन वर्षात पूर्ण करण्याचा अनेक जण संकल्प करत असतात. पण संकल्प करून देखील काही फायदा होत नाही त्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहेत. घरात सुख समृद्धी येण्यासाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी तुम्ही आत्ताच खरा बाहेर काढून टाकाव्या लागतील
या वस्तू आत्ताच टाका घराबाहेर
सुकलेली झाडे
अनेक जण घरामध्ये झाडे लावतात किंवा छोटी मोठी झाडे घरामध्ये सजावटीसाठी ठेवतात. पण कधी कधीही झाडे लक्ष न दिल्यामुळे सुकून जातात. तुमच्या घरातही सुकलेली झाडे असतील तर ती लगेच काढून टाका. घरामध्ये सुकलेली झाडे किंवा रोपे ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबात आनंदा ऐवजी अशांतता निर्माण होऊ शकते.
बंद पडलेले घड्याळ
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरात तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे जीवनात वाईट वेळ येऊ शकते आणि एखाद्याला गरिबीचा सामना देखील करावा लागू शकतो. त्यामुळे घरात वापरात न येणारे घड्याळ असेल तर ते आत्ताच घराबाहेर टाकून द्या.
तुटलेले फर्निचर
घरामध्ये तुटलेले फर्निचर ठेवणे अशुभ मानले जाते. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातही जुने फर्निचर असेल तर ते आत्ताच टाकून द्या. घरात तुटलेले फर्निचर ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते.
तुटलेला आरसा
घरामध्ये तुटलेला आरसा कधीही ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा ठेवल्यामुळे दुःख दारिद्र्य येते. त्यामुळे नवीन वर्ष येण्याआधी तुमच्याही घरात तुटलेला आरसा असेल तर तो आत्ताच टाकून द्या.
विस्कटलेले घर
घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वस्तू वेळीच जागच्या जागी ठेवा. यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यासोबतच कुटुंबातच सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू विखुरलेल्या असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वच्छ आणि व्यवस्थित घरामध्ये आनंद आणि सुख समृद्धी येते.