त्यानंतर गुंतवणुकीवर महिलेला ६५ हजार रुपये परतावा मिळाल्याचा संदेश चोरट्यांनी पाठविला. चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवून महिलेने वेळोवेळी पैसे पाठवले. अशा प्रकारे एकूण ४० लाख तीन हजार रुपये गुंतविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
टास्कच्या आमिषाने २१ लाखांचा गंडा
‘घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना परिसरात राहणाऱ्या तरुणाची २१ लाखांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे.