“मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा व्हिडिओ वारंवार पाहिला आहे. आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाल्याचे मला आढळून आले नाही” असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी आज पत्रकात सांगितले.
द्विवेदी म्हणाल्या की, “अजित पवार यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मते द्यायची हे सांगितले नाही. व्हिडिओमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे हे कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण हा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवला आहे. ते जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत आणि त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे, असे टर्निंग ऑफिसर कविता द्विवेदी यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
अजित पवार काय म्हणाले होते?
आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकास कामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे अजित पवार म्हणाले होते.