४०हून अधिक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आक्षेपार्ह आणि बचावात्मक सुरक्षा, एसओसी आणि एसआयइएम, सायबर इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन, डार्क वेब, सायबर फॉरेन्सिक्स आणि क्लाउड सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा आणि क्रिप्टोग्राफी अषा विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटी, कायदा अंमलबजावणी आणि नॅशनल सिक्युरिटी क्षेत्रातील ४०हून अधिक राष्ट्रीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवर किंवा तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाच्या प्रशासनाने केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे राबविण्यात येणारा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हा उद्योग जगतातील तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांद्वारे शिकविला जाणारा आहे. सखोल व्यावहारिक दृष्टीकोन आणि ज्ञान प्रदान करणारा अभ्यासक्रम आहे.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू
सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम हे विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांमध्ये सायबर सुरक्षा जागरुकता आणि कौशल्य-निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तंत्रज्ञान विभागाचे अभ्यासक्रम मजबूत सुरक्षा उपाय देणारे आहेत.
– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू
विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानासह, सायबर सुरक्षा धोके आणि हल्ले वेगाने वाढत आहेत. कॉर्पोरेट, संस्था आणि सरकारांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे. तंत्रज्ञान विभागाद्वारे राबविण्यात येणारा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हा सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सर्वार्थाने परिपूर्ण अभ्यासक्रम आहे.
– डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव
सायबर सुरक्षा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील अधिक सखोल ज्ञान प्राप्त करून घेता येईल.
– डॉ. आदित्य अभ्यंकर, प्रमुख, तंत्रज्ञान विभाग