Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवलं, 9 जखमी

उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, 9 जखमी

पुण्यातील वाघोली चौकात रविवारी मध्यरात्री डंपरचालकाने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं, त्यात तिघांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले. या घटनेने माजलेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच आता मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उल्हासनगरमध्येही तशीच हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर शहरात मंगळवारी पहाटे मद्यधुंद कार चालकाने 2 ते 3 वाहनांना उडवलं. या अपघामतामध्ये 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगर शहरातील व्हीनस चौक रस्त्यावर आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

ही बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)