तलावमध्ये माशांचा खच, तब्बल ६०० किलो मासे मृत अवस्थेत, नेमकं काय कारण?

मिरजेतील गणेश तलावात पाणी प्रदूषणामुळे सुमारे ६०० किलो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. महापालिकेने तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, प्रदूषणाचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तलावात कचरा आणि निर्माल्य टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

स्वप्निल एरंडोलीकर,सांगली : सांगलीमधील मिरज येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावामध्ये मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. मिरजेतील गणेश तलाव मध्ये पाणी प्रदूषणामुळे अचानकपणे मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाणी प्रदूषित झाल्याने दोन दिवसात सुमारे 600 किलो मासे मृत झाल्याचे समोर आले आहे. मात्र याचे नेमके कारण शोधण्यासाठी आता पाणी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहे. तर या घटनेनंतर गणेश तलावमध्ये निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला.

मिरजेच्या गणेश तलावमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून गेले दोन दिवसापासून मासे मृत होत असून तलावातील पाणी प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेले दोन दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावमध्ये स्वच्छ्ता मोहीम राबवून सुमारे 600 किलोपेक्षा जास्त मृत मासेबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली आहे. पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे..सांगली महापालिका आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच यापुढे पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचा इशारा महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांनी दिला.

गणेश तलाव मध्ये कचरा धार्मिक विधीचे निर्माल्य नागरिकांच्या कडून मोठ्या प्रमाणात टाकले जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य कुंडाचा वापर करावा अशी कित्येक वेळा महापालिका प्रशासना कडून सूचना दिल्या असताना गणेश तलाव मध्ये कचरा टाकला जातो, तलाव परिसरातील खाऊंच्या गाड्या ही गणेश तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आले असून गणेश तलाव मध्ये कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा आदेश उपायुक्त यांनी दिला आहे.

स्वप्निल एरंडोलीकर

लेखकाबद्दलस्वप्निल एरंडोलीकर सहारा समय मुंबईसाठी सांगलीत व्हिडिओ पत्रकार म्हणून २००९ ते २०११ या कालावधीत ३ वर्षांसाठी काम केले आहे. सांगली शहर जिल्हा रिपोर्टर म्हणून सी न्यूज चॅनेलसाठी २०१३ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. जिल्हा वार्ताहर सांगली म्हणून एएम न्यूज चॅनेलसाठी २०१९ते २०२१ पर्यंत काम केले आहे. न्यूज 18 लोकमत (नेटवर्क18) स्ट्रिंगर म्हणून सांगली जिल्ह्यासाठी २०१२ ते ऑक्टो 2022-पर्यंत काम केले आहे. आता महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसाठी जानेवारी २०२३-पासून कार्यरत आहे.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)