मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेचा दि. २१/२२.१२.२०२४ (शनिवार/रविवार मध्यरात्री) आणि दि. २२/२३.१२.२०२४ (रविवार/सोमवार मध्यरात्री) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागांत अप आणि डाउन धीम्या आणि जलद मार्गांवर, पाचव्या आणि सहाव्या मार्गावर काम करेल. एकात्मिक विशेष रहदारी आणि पॉवर ब्लॉक्स परीचालीत केला जाईल ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:-
ब्लॉक क्र. १
- ब्लॉक दिनांक : २१/२२.१२.२०२४ (शनिवार/रविवार रात्री)
- ब्लॉकची वेळ: ०१.०० ते ०४.३० पर्यंत
गर्डर लाँच करण्यासाठी ब्लॉक:
- तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान
- उल्हासनगर येथे १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)
- कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेटच्या जागी आरओबी
- नेरळमध्ये ६ मीटर रुंद एफओबी
ट्रॅफिक ब्लॉक विभाग आणि कालावधी:
- डोंबिवली-कल्याण अप आणि डाउन धिमा मार्ग (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता)
- डोंबिवली-कल्याण अप आणि डाउन जलद मार्ग (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओव्हर वगळता)
- कल्याण – अंबरनाथ अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्ग (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओव्हर वगळता)
- पाचव्या आणि सहाव्या ओळी (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)
ब्लॉकमुळे होणारे परिणाम:-
- मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
ट्रेन क्रमांक 11087 डाउन वेरावळ- पुणे एक्सप्रेस भिवंडी स्थानकावर १० मिनिटांसाठी नियमित केली जाईल
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण:
- खालील डाऊन गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील:
- ट्रेन क्र. 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्सप्रेस
- ट्रेन क्र. 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस
ईशान्य दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कल्याण आणि दिवा/ठाणे स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवण्यात येतील:
- ट्रेन क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्र. 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 20104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्र. 11402 बल्हारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस
दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कर्जत- पनवेल मार्गे वळवल्या जातील आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवल्या जातील:
- ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्र. 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस
- ट्रेन क्र. 11140 हॉस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
ब्लॉक क्रमांक २
- ब्लॉक दिनांक: दि. २२/२३.१२.२०२४ (रविवार/सोमवार रात्री)
- ब्लॉकची वेळ: ०२.०० ते ०५.३० पर्यंत
गर्डर लाँच करण्यासाठी ब्लॉक: तिसरा नवीन पत्रीपुल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान.
ट्रॅफिक ब्लॉक विभाग आणि कालावधी:
- डोंबिवली -कल्याण अप आणि डाउन धीमी लाईन (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता)
- डोंबिवली- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)
- पाचव्या आणि सहाव्या मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)
ब्लॉकमुळे होणारे परिणाम:-
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
- ट्रेन क्र. 18030 अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. 12810 अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस अनुक्रमे टिटवाळा आणि खडवली स्थानकांवर १५ मिनिटांनी नियमित केली जातील.
ट्रेन क्रमांक 12132 अप साईनगर शिर्डी – दादर एक्स्प्रेसही उशिराने धावणार आहे.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन:
- गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवली जाईल.
- गाडी क्रमांक 11020 वगळता सर्व सहाव्या मार्गावरील मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालतील.
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन: ब्लॉक कालावधीत कल्याण आणि ठाणे विभागांमध्ये उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
शनिवार दि. २१.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या विस्तारित /शॉर्ट टर्मिनेटेड केल्या जातील :
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटून कसारापर्यंत चालेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.४२ वाजता सुटेल आणि ती ठाणेपर्यंत चालेल.
शनिवार दि. २१.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या रद्द राहतील:
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटेल
- बदलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदलापूर येथून २१.५८ वाजता सुटेल
- अंबरनाथ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून २२.१५ वाजता सुटेल
- टिटवाळा – ठाणे लोकल टिटवाळा येथून २३.१४ वाजता सुटेल
रविवार दि. २२.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या शॉर्ट ओरीजनेट असतील :
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आसनगाव ही आसनगाव येथे ०८.०७ वाजता येणारी लोकल कल्याण येथून सुटेल.
टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.४० वाजता येणारी लोकल ठाणे येथून सुटेल.
रविवार दि. २२.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या रद्द राहतील
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अंबरनाथ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०२, ०५.१६ आणि ०५.४० वाजता सुटणारी,
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०.०८ वाजता सुटते व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी तसेच
- अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी अंबरनाथ येथून ०३.४३ आणि ४.०८ वाजता सुटणारी,
कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कर्जत येथून ०२.३० आणि ०३.३५ वाजता सुटेल आणि
कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कल्याण येथून ०४.३९ वाजता सुटेल - दक्षिण-पूर्व दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटते.
- ईशान्य दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल.
टीप :
- मेल/एक्स्प्रेस गाड्या, विशेष गाड्या असल्यास, उशिरा धावणाऱ्या किंवा नंतरच्या तारखेला सूचित केलेल्या गाड्या देखील त्यानुसार नियमन/शॉर्ट टर्मिनेटेड केल्या जातील किंवा त्यांच्या संबंधित गंतव्यस्थानी उशीरा पोहोचतील.
- प्रमुख ब्लॉक्स व्यतिरिक्त, इतर शॅडो ब्लॉक्स देखील कल्याण-अंबरनाथ विभागावर चालवले जातील.
- हे ब्लॉक्स प्रवाशांच्या आणि देशाच्या हितासाठी केले जातात. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.