Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळावे म्हणून हा समाज आक्रमक
  • 20 Dec 2024 09:08 AM (IST)

    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळावे म्हणून हा समाज आक्रमक

    भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने आर्य वैश्य कोमटी समाज आक्रमक. सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महाआरती करत घातले साकडे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुबुद्धी मिळावी आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी पंढरपुरात श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महाआरती.

  • 20 Dec 2024 09:06 AM (IST)

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा मोठा निर्णय

    संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शन करता येणार नाहीत. सर्व खासदारांना दिल्या सूचना. कोणतीही अडवणूक किंवा निदर्शन , आंदोलन न करण्याची सक्ती. काल भाजप आणि इंडिया आघाडीचे खासदार एकमेकांसमोर भिडल्यानंतर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय.

  • 20 Dec 2024 09:05 AM (IST)

    मुंबई परिसरात गुलाबी थंडी वाढली

    मुंबई परिसरात गुलाबी थंडी वाढली आहे. मुंबईच्या तापमानात फारशी घट झाली नसली तरी किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. वारेही संथ गतीने वाहत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात आद्रता ही आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम मुंबईच्या हवा गुणवत्तेवर झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.

  • 20 Dec 2024 09:04 AM (IST)

    परभणी प्रकरणावर मुख्यमंत्री आज विधानसभेत बोलणार

    परभणी प्रकरणावर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार. परभणी घटनेला घडून दहा दिवस उलटले. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर अनुयायांनी कालपासून लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलय. सकाळी 11 ते दुपारी चार अशा वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे दररोज आंदोलन करण्यात येणार.

  • (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)