कतरिना कैफ कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्टकरत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.
कतरिना सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
कतरिना हिच्या फोटोंनी चाहत्यांचं मन जिंकलं आहे. साडीत कतरिना हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तुम्ही देखील अभिनेत्रीचे साडीतील खास लूक फॉलो करु शकता.
प्रत्येक साडीमध्ये कतरिना सुंदर दिसते. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा होतात. आता लग्न सराई असल्यामुळे तुम्ही देखील परफेक्ट लूकसाठी कतरिनाचा लूक फॉलो करु शकता.
कतरिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.