माझ्या निवडणुकीचं… छगन भुजबळांचा मराठा समाजाबद्दल खळबळजनक खुलासा

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. विशेष म्हणजे ते लवकरच बंड पुकारु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी एक मोठे आवाहनही केले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व आले आहेत. काल मी नाशिकच्या लोकांना भेटलो आणि येवल्याला लासलगावला गेलो. येवला लासलगावमध्ये दुखाची आवकळा आली आहे. त्यांना शॉक बसला. त्यातून बाहेर येत नाही. मी त्यांना धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना समजावलं. पण ही गोष्ट फक्त येवला लासलगावची नाही. ही मागासवर्गीय, दलित मुस्लिमांचीही तीच अवस्था आहे. माझ्या विरोधात काम केलेल्या मराठा समाजातील लोकांनाही हे डायजेस्ट झालेलं नाही. असं होऊच शकत नाही असं ते म्हणत आहेत. अख्ख्या देशातून मेसेज येत आहे. पंकज, समीर आणि कार्यकर्ते मेसेजला उत्तर देत आहे. आमच्या शहरात या, जिल्ह्यात या, राज्यात या अशी मागणी सुरू झाली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

कधी कधी अशी घटना घडते, शांत असलेली माणसं पेटून उठतात. तसा प्रकार मला दिसत आहे. आपण पेटून उठला तरी पेटवापेटवी करायची नाही. तुमच्या मनातील दुख जाहीर करा. शिवीगाळ नको, जोडो मार नको. काय गरज नाही. काय चाललं ते त्यांना माहीत असतं. रोज सकाळी ८ वाजता राज्यात काय चाललं त्याची ब्रिफिंग मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना कळतं. तुम्ही निषेध दाखवता त्यात संयम ठेवा. आपल्यासोबत दलित, मागासवर्गीय, मुस्लिम आहेत. तसे मराठाही आहे. माझ्या निवडणुकीचं सारथ्य मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं, असे छगन भुजबळ म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)