Sharad Pawar Meet PM Narendra Modi : मोठी बातमी, शरद पवारपंतप्रधान मोदींमध्ये चर्चा, भेट म्हणून दिली ही फळं

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवारांसोबत यावेळी सातारा आणि फलटणचे दोन डाळिंब उत्पादक शेतकरी होते. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाशी संबंधित ही भेट होती, असं पवारांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनी त्यांना भेट म्हणून डाळिंब दिली.

(बातमी अपडेट होत आहे)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)