सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाहीये. विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)