Uddhav Thackrey : वन नेशन, वन इलेक्शन जनतेच्या डोक्यावर लादू नये -उद्धव ठाकरे

लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे, त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे होता कामा नये, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली. या ( विधानसभा) निवडणुकीत राज्यात जे झालं ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही, आणि हे पटलेलं नसताना त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीने निवडणुका लादू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन वने इलेक्शनला त्यांनी ठाम विरोध दर्शवला.

लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. मात्र काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्ष या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत,असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील, आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदान घ्यायला का घाबरता ?

मारकडवाडी साधं गाव आहे. मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला. संपूर्ण महाराष्ट्राने आम्हाला मतं दिली, प्रेम दिलं असं तुम्ही म्हणता, मग ईव्हीएमवर जी मतं पडली, तीच मतं बॅलेट पेपरवरही तुम्हाला येतील ना. लोकशाहीमध्ये मी कोणाला मत देत आहे, माझं मत कुठे जात आहे, हे मला कळलंच पाहिजे. माझा तो अधिकार आता हिरावून घेतला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. निवडणूक प्रक्रियेत बॅलेट पेपरवर जेव्हा मी शिक्का मारायचो, तेव्हा मी या व्यक्तीला, या नशाणीवरती शिक्का मारून मतदान केलंय हे मला कळायचं. आता मी बटण जरूर दाबतो, दिवाही नक्की लागतो, माझी रिसीटही दिसते, पण ती कुठे जाते ते कळत नाही, ती मोजली जात नाही. मत रजिस्टर कुठे झालंय ते मला कळत नाहीये.

त्यामुळेच लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांड

लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. मात्र काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्ष या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत,असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील, आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)