Cabinet Expansion Sangli Solapur no minister : पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यापाठोपाठ कोल्हापूरनेही मंत्रिमंडळ विस्तारात बाजी मारली आहे, मात्र सांगली व सोलापूर जिल्हा उपाशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
Cabinet Expansion : सातारा-कोल्हापूर तुपाशी, सांगली-सोलापूर उपाशी; पुन्हा ‘बाहेरचे’ पालकमंत्री मिळणार
महायुतीची पश्चिम महाराष्ट्रात ताकद
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यात एकूण ३७ आमदार आहेत. त्यामध्ये महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील दहा व आठ अशा सर्व जागा महायुतीने मिळवल्या. सांगली जिल्ह्यातील आठपैकी पाच तर, सोलापुरातही ११ पैकी पाच जागा मिळवत महायुतीने किमान ताकद कायम ठेवली.
शिंदेंच्या साताऱ्याला पाच मंत्रिपदं
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्रात अनेकांना मंत्रिपदे मिळतील अशी चर्चा होती. या चर्चेत अनेक नावे होती. परंतु मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तेव्हा सातारा जिल्ह्याने मोठी झेप घेतल्याचे लक्षात आले. आठ आमदार असलेल्या या जिल्ह्यात तब्बल चार आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. महायुतीतील तीनही पक्षांनी आपापल्या कोट्यातील मंत्रिपदे या जिल्ह्याला बहाल केली आहेत. भाजपने शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे या दोघांना मंत्री केले. राष्ट्रवादीच्या वतीने मकरंद पाटील आणि शिवसेनेच्या वतीने शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळाले आहे. मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे या जिल्ह्याला तब्बल पाच मंत्रिपदे मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Raju Patil : मनसेचा माजी आमदार ‘सागर’ बंगल्यावर, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कारण इंटरेस्टिंग
कोल्हापूर जिल्ह्याला हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली. मुश्रीफ कॅबिनेट तर आबिटकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दहापैकी दहा आमदार महायुतीचे निवडून आल्यानंतर विनय कोरे यांनाही मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. परंतु, जनसुराजच्या हातात शेवटी नारळच आला आहे.Trupti Mulik : अजित दादांची गाडी चालवल्याने कौतुक, महिला चालक तृप्ती मुळीकला अटक, ८४ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप
सांगली-सोलापूर उपेक्षित
मंत्रिपदाच्या या शर्यतीत सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. सांगली जिल्ह्यातून जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली शहर मतदारसंघातील आमदार सुधीर गाडगीळ या दोघांची नावे चर्चेत होती. परंतु, दोघांनाही संधी मिळाली नाही. पडळकर यांचे नाव शेवटच्या क्षणी मागे पडले. अडीच वर्षे मंत्री असलेल्या सुरेश खाडे यांना डच्चू देण्यात आलेला आहे.