हा बोगदा खोदण्यासाठी साधारण २७ हजार ५१५ किलोग्राम विस्फोटकांचा वापर करण्यात आला. विशेष तज्ज्ञांचे साह्य घेवून बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या देखरेखीत २१४ वेळा स्फोट घडवून यांचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी उच्च स्तरीय तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी साधारण २१ सुरंग तयार केले जाणार आहेत. यापैकी १६ बोरिंग मशीनद्वारे खोदकाम करुन केले जाणार आहेत तर उर्वरित पाच यांना न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने खोदकाम करुन बनवले जाणार आहेत.
प्रकल्प खर्च १.०८ लाख करोड
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १.०८ लाख करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पावर १० हजार करोड केंद्र सरकार खर्च करणार आहे तर उर्वरित खर्च गुजरात आणि महाराष्ट्र प्रत्येकी पाच हजार करोड रुपयांचा उचलणार आहे, राहिलेली रक्कम जपान सरकार ०.१ व्याजावर देणार आहे.
बुलेट ट्रेन कधी सुरु होणार?
14 सप्टेंबर २०१७ साली मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते, २०२२ पर्यंत साधारण हा प्रकल्प सुरु होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण नंतर प्रकल्पांचे लोकार्पण २०२३ वर ढकलण्यात आले आणि आता थेट २०२६ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज आहे. या बुलेट ट्रेनला साधारण दहा डब्बे असतील आणि अश्या ३५ बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर चालवले जातील. या बुलेट ट्रेनचा साधारण ५०८ किलोमीटर लांबीचा रस्ता असेल यापैकी ३५१ किमीचा भाग गुजरात तर महाराष्ट्रातील १५७ किमीच्या भागावरुन ही बुलेट ट्रेन धावेल.