प्रतिनिधी, मुंबई : चोरी केलेल्या भंगाराचे वाटप करण्यावरून एका चोराने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना अंधेरीच्या सहार परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. आकाश रौनक असे मृत तरुणाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी त्याचा मित्र गिल्बर्ट याला अटक केली. दोघेही भंगारचोर असून काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले होते.मरोळ पाइपलाइन परिसरात आकाश हा त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. काहीच कामधंदा नसल्याने तो मित्र गिल्बर्ट याच्या मदतीने चोऱ्या करू लागला. चोरी आणि मारामारीच्या गुन्ह्यांखाली या दोघांना तुरुंगातही जावे लागले होते. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी असलेले लोखंडी साहित्य हे दोघे चोरायचे आणि ते विकून मिळणाऱ्या पैशांतून दारू, ड्रग्जची नशा करायचे. शनिवारी मध्यरात्री चोरलेल्या साहित्याच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला. कमी साहित्य दिल्याचा आरोप करीत आकाश गिल्बर्टशी भांडत होता. गिल्बर्टने रागाने जवळच पडलेला दगड उचलून आकाशच्या डोक्यात टाकला.
घरी न परतल्याने आकाशच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून गिल्बर्टला अटक केली. गिल्बर्टने हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.