Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर शरीरात अनेक गंभीर आजार उद्भवतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सुरू झाल्यास बहुतेक लोक फूड सप्लिमेंट्स घेतात. पण जर कोणत्याही शरीरात व्हिटॅमिन बी 12 जास्त झाले तर मात्र काय करावे हे अनेकांना माहित नसेल. हो व्हिटॅमिन बी12 जास्त झाले तरी ते शरीरासाठी चांगले नसते.
जर बी 12 जीवनसत्व शरीरात जास्त झाले तर तुम्हाला मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी या सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अतिसार, थकवा आणि अशक्तपणा येतो. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त असल्यास त्वचेवर लाल पुरळ देखील येतात.
व्हिटॅमिन बी 12 वाढल्यास घाबरू नका
व्हिटॅमिन बी 12 शरीरात खूप प्रमाणात वाढले तर घाबरून जाऊ नका. व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. जे किडनी आणि लघवीद्वारे बाहेर जाते. 2 ते 4 आठवड्यांत त्याचे परिणाम दिसू लागतात.
कोणत्या गोष्टी खाऊ नये
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 जास्त झाले तर आठवडा तुम्ही काही गोष्टींचे सेवन टाळले पाहिजे. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त असेल तर चिकन, मासे आणि सॅल्मन फिश तसेच दूध, दही आणि दुग्धजन्य पदार्थ अजिबात खाऊ नयेत. कारण शरीरात जास्त B12 असल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. काही लोकांच्या ऑप्टिक मज्जातंतूला देखील नुकसान होऊ शकते. तर मुलांमध्ये अंधत्वाची समस्या येऊ शकते.
व्हिटॅमिन बी 12 घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
डॉक्टरांच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. B1, B2, B6 आणि B9 हे देखील पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आहेत. व्हिटॅमिन सी देखील असेच काम करते. ही सर्व जीवनसत्त्वे रिकाम्या पोटी जास्त शोषली जातात. त्यामुळे नाश्त्याच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर ते घेणे अधिक चांगले असते. यामुळे शरीराला जास्तीत जास्त जीवनसत्त्वे मिळतात. आरोग्य तज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी घेण्याची एक विशेष वेळ आहे. दिवसाच्या एकाच वेळी त्यांचे सेवन केल्यास शरीराला त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो.
अस्वीकरण: बातम्यांमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी, संबंधित तज्ञाचा सल्ला घेतला गेला पाहिजे.