परभणी मराठवाड्यातील महत्वाचं शहर आहे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. कोणी माथेफिरूने संविधान आणि बाबासाहेब यांचा अपमान केला. आरोपी पकडला गेला आहे. मात्र त्याच्या मागे कोण आहे का याची चौकशी व्हावी. मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील दिल्लीत बोलणार आहे. मी आंबेडकरी अनुयायांना आवाहन करतो की, त्यांनी शांतता राखावी, असं रामदास आठवले म्हणालेत.
परभणीत झालेला प्रकार निंदनीय आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. बाबासाहेब यांच्या पुतळ्या बाबत घडलेली घटना अनेक दिवसांनी घडली आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेब यांचे पुतळे आहेत. ते उभे करण्यात मराठा समाजाचा देखील मोठा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज या कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये. यामामगे ज्याचा हात असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री या प्रकारांची चौकशी करून आरोपींना शिक्षा करतील हा विश्वास आहे, असं आठवले म्हणाले आहेत.