बारामती : लग्नाचे आमिष दाखवून २०२२ ते २०२४ अशी तब्बल दोन वर्ष वेळोवेळी इच्छेविरुद्ध तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले, जातीवाचक उल्लेख करून तिचा अपमान केला व हाकलून लावण्यात आले. बारामतीसह पाचगणी व महाबळेश्वरात नेत तरुण पीडितेसोबत हे संतापजनक कृत्य करण्यात आले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून हे कृत्य करणाऱ्या बापलेकाला बारामती शहर पोलिसांनी शहरातील जामदार रोड येथून ताब्यात घेतले आहे.
बारामती पोलिसांनी जामदार रोड येथील अक्षय विजय निगडे व विजय निगडे या दोघांविरोधात सदर प्रकरणी ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही बारामतीतील असून या महिलेची अक्षय निगडे याच्याशी ओळख झाली. पीडित महिलेची जात माहित असतानाही लग्नाचे अमिष दाखवून अक्षय निगडे याने ७ जुलै २०२२ पासून ५ मे २०२४ या कालावधीत बारामतीसह पाचगणी व महाबळेश्वरमध्ये पीडितेच्या इच्छेविरोधात शरीरसंबंध प्रस्थापित केले.
पीडितेने लग्नासाठी आग्रह धरल्यावर ‘तू अमूक जातीची असून तुझ्याशी लग्न केल्यास माझी समाजातील इज्जत जाईल’ असे म्हणत अक्षयने पीडितेचा अपमान केला. यातच त्यांचे वडील विजय निगडे यांनी देखील तू येथून जा, आपण काय आहे ते बघू, नाही तर तुझ्यावरच केस करून खोट्या गुन्ह्यात गुंतवेन, अशी धमकी दिली, पीडितेने केलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तर सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे करत आहेत.