माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हे सेवानिवृत्त शिक्षक राहतात. या शिक्षकाने नुकतेच त्याच शाळेत शिकणाऱ्या माजी विद्यार्थिनीशी प्रेम विवाह केला आहे. या विद्यार्थिनीचे वय आहे अवघे वीस वर्ष…. कोरोनाच्या काळात पत्नीचे निधन झाले आणि हे शिक्षक एकाकी पडले. उतार वयात आधार म्हणून त्यांनी हा प्रेमविवाह केल्याची गावात चर्चा आहे.
अर्थात या शिक्षकांना आता नातवंडे आहेत. मग या वयात त्यांनी विवाह करावा का? असा प्रश्न अनेकांना पडला. नातेवाईकांना तर पडलाच, पण पोलिसांना देखील पडला. म्हणूनच माळेगावच्या पोलीस ठाण्यात पोलिसांनी सबुरीने घेतले, समजावून सांगितले, धाक दाखवला, पण या दोघा नवदाम्पत्याला काहीच फरक पडला नाही.
संबंधित वधू असलेल्या माजी विद्यार्थिनीने देखील आपण शुद्धीवर राहून, विचार करूनच हा विवाह केला असून, आपण या शिक्षकाला सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला, तर संबंधित शिक्षकाने देखील यात काहीच गैर नाही, असे ठामपणे सांगितले. त्यामुळे साहजिकच कायद्याच्या कोणत्याही कलमात या दोघांना अडविण्याचे काहीच कारण नसल्याने हा विवाह सध्यातरी संपन्न झालेला आहे.