Heat wave in India | भारतातील ‘या’ शहराच्या उष्ण तापमानाची जगाने घेतली नोंद

मुंबई – यंदा जानेवारीपासूनच महाराष्ट्रात मे महिन्याप्रमाणे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.राज्यातील काही भागात यंदा तापमानात वाढ झाले तर एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेतच केरळच्या किनारपट्टीवर दाखल होणार आहे. मच्छीमारांना तसे सूचित करण्यात आलंय.

देशातील उष्ण शहर

पण तुम्हाला माहितेय का जगात भारतातील एका शहराची सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद करण्यात आले. कारण या शहरात पारा तब्बल ५० अंशाच्या वर पोहचला होता, हे शहर आहे राजस्थानमधील फिलोदी या शहरात साधारण २०१६ मध्ये पारा ५१ अंशावर पोहचला होता, जागतिक स्तरावर भारतातील सर्वाधिक उष्ण शहरामध्ये यांची वर्णी लागली होती.
हाय गर्मी! मुंबई पुन्हा तापली, आजही घामाच्या धारा, हवामान खात्याकडून मान्सूनबाबत मोठी अपडेट

थर्मामीटर असलेले स्मारक

सध्या मागील तीन ते चार दिवस पुन्हा एकदा पारा ५० अशांच्या जवळ पोहचलेला पाहायला मिळतोय. स्थानिकांकडून भीती व्यक्त केली जाते की पुन्हा एकदा २०१६ च्या उष्णतेच्या लाटेची पुनरावृत्ती होवू शकते. फिलोदीमध्ये थर्मामीटरचे स्मारक उभारण्यात आले आहे.हवामान खात्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि युपी या राज्यांना उष्णेतच्या लाटेचा इशारा दिलाय.

फिलोदीमध्ये शुकशुकाट

आता फिलोदीमध्ये पारा ४६ अंशावर पोहचला आहे. लोकांनी उष्णतेमुळे घराबाहेर पडणे टाळले आहे. बाजारपेठा ते रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. यासह दिल्ली आणि युपीत सुद्धा परिस्थिती तशीच पाहायला मिळते. दिल्ली ते युपी पारा जवळजवळ ४५ अशांवर पोहचला त्यामुळे नागरिकांनी विनाकरण घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे.