निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची. निवडणुका झाल्या की मतमोजणी पूर्वी कोण निवडून येईल याच्या विषयी पैजा लागतात. काही जण पैशाच्या स्वरूपात, काही जण फोर व्हीलर, टू व्हीलर या स्वरूपात पैजा लावतात. तर काही बहाद्दर थेट जमिनीचीही पैज कोण निवडून येणार याबाबत लावतात. मात्र लाभाच्या स्वरूपात असणाऱ्या अशा पैजांच्या वर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ येथे दुचाकी गाड्यांची पैज लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा पैज लागली आहे. ही पैज पैशांची किंवा वस्तूची नसून सामाजिक बांधिलकीची आहे. सामाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून निसर्ग संवर्धनाची ही पैज लावण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे एका अनोख्या पैजेची चर्चा रंगली आहे. पर्यावरणपूरक अशा 51 झाडांच्या वृक्षारोपणाची ही पैज आहे. भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे जर या निवडणुकीत निवडून आले तर तात्यासाहेब शिंदे हे 51 झाडांची लागवड करणार आहेत. आणि काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील जर निवडून आले तर महादेव हिंगमिरे हे 51 झाडांचे वृक्षारोपण करणार आहेत. वृक्ष संवर्धनाची लागलेल्या या अनोख्या पैजी विषयी सर्वत्र उत्सुकता लागली आहे. कारण विजय कोणाचाही होवो, 51 झाडांची लागवड होणार आहे आणि शेवटी निसर्गच जिंकणार आहे.
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा एक पैज लागली आहे. मात्र ही पैज सामाजिक उपक्रमाची लागली असून या आगळ्यावेगळ्या पैजे विषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील जिंकणार की काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष लढणारे विशाल पाटील विजयी होणार, यावरुन पैज लागली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं नाव चर्चेतही नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.