देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: Facebook
देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. यावर प्रतिक्रिया द्याव असं काही नाही. राज्याचा निकाल धक्कादायक आला. त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. गावागावात मॉक पोल सुरू आहेत. पण तिथे १४४ लागू केलं जातं आहे. बहुमत असतानाही १३ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले. फडणवीसांना शुभेच्छा, असं राऊत म्हणालेत.