उद्योगजगताच्या मागणीनुसार आणि नविन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक सूचनांनुसार हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ब्लॉकचेन क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षकांची टीम हा अभ्यासक्रम शिकवणार आहे. विद्यार्थ्यांना हॅन्डस् ऑन ट्रेनिंग मिळावी; तसेच त्यानंतर रोजगारासाठी मदत व्हावी, यासाठी सर्व मुलांना इंटर्नशिप देण्याची तरतूद अभ्यासक्रमात करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, विद्यार्थ्यांना येत्या ३० मे पर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्कही इतर विद्यापीठांच्या तुलनेत कमी आहे. या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे; तसेच विद्यार्थी टेक्नॉलॉजी विभागाला भेट देऊ शकतात. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सक्षम करणारे अभ्यासक्रम शिकून रोजगाराच्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पुणे विद्यापीठाच्या टेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान डेटा सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण असल्याने या तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे.
डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
इंडस्ट्रीमध्ये गरज असलेल्या कौशल्याची गरज ओळखून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रम अंतर्भूत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. भविष्यातील संधी ओळखून विद्यार्थांनी ‘ब्लॉकचेन’सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा.
डॉ. आदित्य अभ्यंकर, तंत्रज्ञान विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
– एखाद्या आस्थापनेतील किंवा कंपनीतील संगणकीय किंवा क्लाउडवरील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.
– डेटा सुरक्षेसाठी या प्रणालीमध्ये तिहेरी सुरक्षा व्यवस्था असते.
– डेटा सुरक्षेच्या अन्य प्रणालींच्या तुलनेत अधिक भक्कम मानली जाते.
– एक त्रयस्थ निरीक्षक प्रणालीचा समावेश असल्यामुळे डेटा सुरक्षा भेदणे कठीण होते.