पोलिसांनी कंट्रोल रुमला कळवलंच नाही
१९ मे च्या रात्री झोनल पोलीस ऑफिसर डीसीपी संदीप गिल यांची नाइट ड्युडी होती. त्यादरम्यान ही घटना घडली होती पंरतु प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळवल्याने ही माहिती रात्री ऑन ड्युटी असलेले डीसीपी संदीप गिल यांच्याकडे पोहचलीच नाही.
देवेंद्र फडणवीसांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची थेट पुणे पोलिस मुख्यालयात जावून माहिती घेतली तसेच दोषींवर कडक कारवाई करु असे ग्वाही पिडीतांच्या कुटुंबांना दिले. या प्रकरणात पोलिस खात्याने दिरंगाई केली असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तर दुसरीकडे आमच्या मुलांना न्याय मिळवून द्या असे पिडीतांच्या कुटुंबानी मागणी केले.
प्रकरणातील अपडेट
पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपी मुलाला बाल न्यायमंडळाने चौदा दिवस बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश बुधवारी दिलेत.त्यामुळे तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह इतर अटी शर्तींवर जामिनावर बाहेर असलेल्या या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत निरीक्षण गृहात राहावे लागणार आहे. मंडळाच्या प्रधान न्यायाधीश एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला.