मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, दहा वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Mumbai Maharashtra Temperature Cold : राज्यात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले जात आहे. मुंबईसह उपनगरातही आता थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईत आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. जे गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. सध्या या गुलाबी थंडीचा मुंबईकर आनंद घेत आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)