वाद चांगले असतात… काय म्हणता? धक्काच बसला राव?; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा!

पार्टनरमध्ये काही दिवस सुखाचे तर काही दिवस दु:खाचेही असतात. त्यात वाद हे पाचवीला पुजलेले असतात. थोड्या थोड्या कारणावरून हे वाद होत असतात. त्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असते. पण वाद कधी कधी चांगले असतात. त्यामुळे नाते मजबूत होते. दोघेही जर समजूतदार असतील तर वादाचं मूळ कारण शोधतात. त्यावर उपाय काढतात आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नये याची काळजी घेतात. वादामुळे ही मॅच्युअरीटी येऊ शकते. त्यामुळे नातंही दृढ बनतं आणि दोघांपैकी एकही जण हलक्या कानाचा बनत नाही. कारण त्याला वादाच्या मुळाशी जाण्याची सवय लागलेली असते.

वाद हे विवाह जीवनात एक समस्या असू शकते. मात्र, मानसशास्त्रज्ञांच्या मते, वाद हे पार्टनरच्या आत्मसंबंधाला बळकट करण्यासाठी एक संधी असू शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दिवशी पार्टनरशी वाद घालणे आवश्यक आहे. एक आरोग्यपूर्ण विवाह जीवन टिकवण्यासाठी कधी कधी वाद आवश्यक आहेत, असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.

पार्टनरमधील वादाचे फायदे :

अनेकदा पार्टनरशी भावना व्यक्त करताना काही लोकांना संकोच होतो. सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. पण हे लोक वाद घालताना आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे आतल्या अनेक भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.

जेव्हा दोघांमध्ये वाद होतो, तेव्हा पार्टनरकडून समस्यांचाच पाढा वाचला जातो. त्यामुळे समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यास मदत होते. या समस्या कुठून सुरू झाल्या, त्या कशा सोडवता येईल यावर भर दिला जातो. त्यामुळे या समस्या समजून पुढील मार्ग काढणं सोपं जातं.

काही लोक मतभेद व्यक्त करण्यास संकोच करतात. परंतु वादावेळी आपले मत अधिक खुलेपणाने मांडतात. यामुळे पार्टनरला आपली आवड-निवड आणि मर्यादा समजून घेण्यास मदत होऊ शकते.

वादामध्ये पार्टनरला आपले विचार व्यक्त करण्याची आणि ऐकण्याची संधी मिळते. यामुळे आपसातील समज वाढते.

जर वाद सुटले, तर नातं अधिक मजबूत होते आणि परस्पर विश्वास आणि समज वाढवते.

नात्यात अतूट नातं आणण्यासाठी वाद महत्त्वाचे ठरतात. याशिवाय, व्यक्तिमत्व विकासासाठी कधी कधी वाद आवश्यक असतात. आपल्या पार्टनरशी वाद करताना आपल्याला आपल्या सामर्थ्यांची आणि मर्यादांची चांगली कल्पना येते. त्याचा उपयोग आत्म-सन्मान आणि आत्मविश्वास वाढविण्यास होतो.

काही परिस्थितींमध्ये, चिंता आणि दबाव कमी करण्यास वादामुळे मदत होऊ शकते. भावना व्यक्त करताना तणाव कमी होतो आणि मानसिक समाधान मिळते.

( डिस्क्लेमर : इथे दिलेली माहिती ही अधिकृत नाही. आम्ही त्याला दुजोरा देत नाही. तथापि, ही माहिती अनुसरण करण्यापूर्वी, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. )

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)