29 Nov 2024 10:00 AM (IST)
मुंबईत प्रहारची बैठक सुरू
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक सुरू झाली. भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी, वाय. बी.चव्हाण सेंटर मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
29 Nov 2024 09:58 AM (IST)
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक सुरू झाली. भविष्यातील राजकिय वाटचालीसाठी, वाय. बी.चव्हाण सेंटर मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
29 Nov 2024 09:52 AM (IST)
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर छापा
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर खेड तहसीलदार आणि राज्य दक्षता पथकाने छापा टाकला. 36 कंटेनर सह 3 हजार 600 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला.
29 Nov 2024 09:49 AM (IST)
दिल्लीने डोळे वटारले की शिंदेंना गप्प बसावं लागेल – संजय राऊत
राज्याच्या स्वाभिमानच्या गोष्टी महायुतीने करू नयेत. राज्यात कोणी काय करावं हे दिल्लीतून नरेंद्र मोदी, अमित शाह ठरवत आहेत. एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार त्यांचा स्वाभिमान राहिलेला नाही, दिल्लीने डोळे वटारले की ते शांत बसतात.
29 Nov 2024 09:37 AM (IST)
महायुतीच्य्या नेत्यांची आज मुंबईत पुन्हा बैठक, मंत्रीपद ठरणार
काल दिल्लीत अमित साह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. देवेंद् फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत आजची बैठक पार पडणार असून त्यामध्ये खातेवाटपावर चर्चा होऊ शकते.
29 Nov 2024 09:34 AM (IST)
गृह खाते सोडण्यास भाजपचा नकार
गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्या कडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे.
गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा,, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम ,उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती देण्यात येऊ शकतात.