घराबाहेर पडताच हुडहुडी, मुंबईत 8 वर्षातील सर्वात कमी तापमान; पुणे, नाशिक, जालन्यात गारठा वाढला

विधानसभा निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं असलं तरी मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस थोडा सुखकारक होता. एरवी सदोदित घामाच्या धारांचा सामना करावा लागणाऱ्या मुंबईकरांना मंगळवारी सुखद थंडी अनुभवायला मिळाली. मुंबईमध्ये आता थंडीच्या वातावरणाला सुरवात झाली आहे. त्यातच मंगळवारी मुंबई मधील गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद हवामान खात्याकडून नोंदवण्यात आली. तसेच पुणे, नाशिक, जालन्यातही गारठा वाढला.

मंगळवारी मुंबईमधील नीचांकी तापमान हे 16.8 अंश इतकं होतं. त्याची हवामान खात्याकडून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस मुंबईत अशाच प्रकारचं वातावरण असणार आहे, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मॉन्सून संपल्यावर उत्तरेकडील थंड वारे राज्यात येऊ लागल्यामुळे हा वातावरणातील बदल जाणवू लागला आहे. त्यामुळे ह्या गुलाबी थंडीची लाट पुढील काही दिवस मुंबई वर असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मुंबईत हवेची गुणवत्ता खराब

मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा खराब स्थितीत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईतील एक्युआय हा 118 वर पोहोचला आहे..मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज आहे असं अभ्यासकाचं म्हणणं आहे. स्थानिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबईला तटीय एअरशेडमध्ये समाकलित करण्याचा प्रस्ताव एका देशव्यापी अभ्यासाने मांडला आहे. या प्रादेशिक एअरशेडद्वारे शहरी आणि ग्रामीण प्रदूषण स्रोतास प्रभावीपणे नियंत्रित केलं जाऊ शकतं

मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023’ च्या नुसार, जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील PM 2.5 पातळीत 2022 च्या तुलनेत 23 % वाढ झाली होती. यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली आहे. यावर प्रशासनाने योग्य पावलं ऊचलणं बंधनकारक आहे..

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)