शिवसेनेचे नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सध्या कार्यभार पाहणारे, एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेबाबत दुपारपासूनच सस्पेन्स वाढला होता. अखेर यावेळी त्यांनी उपस्थितांशी आणि माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली . यावेळी त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कामाचा आढावा घेतानाच विकासकामांची यादी वाचून दाखवली. तसेच लाडक्या बहीण योजनेचा दाखला देत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली आहे असे सांगत त्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
तसेच या योजनेस नावं ठेवणाऱ्या, या योजनेवर टीका करणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी त्यांची जागा दाखवली असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी बाजूला ठेवलं, असं सांगत त्यांनी महायुतीला मिळालेल्या विजयाचं आणि मविआच्या दारूण पराभवाचं कारण पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
राज्य आणि केंद्र सरकार समविचारी असते तेव्हा राज्याच्या प्रगतीचा वेग गतिमान होतो. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात मी समाधानी आहे. मी काही डिटेल्समध्ये जाणार नाही. पण आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारने असे निर्णय घेतले नव्हते. आम्ही सर्वांबाबत निर्णय घेतले. कुणाचेही प्रश्न ठेवले नाही. सिंचनाच्या १२४ प्रकल्पांना आम्ही मान्यता दिल्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पूर्वी चार प्रकल्पांना मान्यता मिळायच्या, राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. आम्ही राज्य एक नंबरला नेण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य एक नंबरला होतं. महाविकास आघाडीच्या काळात तीन नंबरला होतं. आम्ही सहा महिन्यात नंबर वनला आणलं असंही शिंदे यांनी सांगितलं.
आम्ही जे काम केलं, जे निर्णय घेतले आणि सकारात्मकता दाखवली, त्यामुळेच या निवडणुकीत (आमच्यावर) मतांचा वर्षाव झाला. लाडक्या बहिणीचा सख्खा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. बाकीचे सावत्र भाऊ झाले. मी म्हटलं सावत्र भावांना लक्षात ठेवा,. महिलांनी त्यांना बाजूला ठेवलं,अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मी समाधानी आहे. माझी लाडका भाऊ ही ओळख ही मोठी आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आम्ही रडणारे नाही लढणारे
आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, लढणारे आहोत. लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय मिळाला. हा विजय आतापर्यंतच्या विजयात ऐतिहासिक गणना होते. याचं कारण एवढं की आम्ही जीव तोडून मेहनत केली. जीव तोडून निर्णय घेतले. लोकांमध्ये गेलो. आम्ही जे काही काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शे