Mahayuti : एकनाथ शिंदे आता मनाचा मोठेपणा दाखवा, भाजप खासदाराच आवाहन

एकनाथ शिंदे, नेते, शिवसेनाImage Credit source: Facebook

महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी महायुतीच्या आसपासही नाहीय. इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील जनतेने असा कौल दिलाय. त्यामुळे विरोधकांना निकालावर अजिबात विश्वास बसत नाहीय. ते निकालाला आव्हान देण्याची तयारी करत आहेत. महायुतीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी 132 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 145 आहे. महायुतीकडे त्यापेक्षा जास्त जागा आहेत. पण मुख्यमंत्रीपदाचा पेच अजून सुटलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेला विलंब होतोय.

या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला इतकं घवघवीत यश मिळालं. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काल राज्यपालांना भेटून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्यावर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

‘म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करतो’

“2019 ला लहान भावाला आम्ही सिंहासनावर बसवलं, आता एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा” असं आवाहन भाजपचे राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे यांनी केलं आहे. महायुतीत सर्व समन्वयाचं वातावरण आहे. जनतेने आम्हाला जास्त जागा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत आहोत” असं डॉ अजित गोपछडे म्हणाले.

‘विरोधकांनी आत्ममंथन करावं’

“देवेंद्र फडणवीस अडचणीच्या काळात धावून जाणारे नेते आहेत. जनतेचा कौल हा महायुतीमध्ये भाजपला आहे. उपमुख्यमंत्री कोण व्हावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. 2019 ला लहान भावाला आम्ही सिंहासनावर बसवलं. आता एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा” असं डॉ अजित गोपछडे म्हणाले. ‘विरोधकांनी आत्ममंथन करावं’ असा सल्ला डॉ अजित गोपछडे यांनी दिला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)