मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य…

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेImage Credit source: ANI

मागच्या काही दिवसापासून जे व्हीडिओ समोर येत आहेत. ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही दहा वर्ष जे आमदार भेटत नव्हते ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे, असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष किती एकत्र एकत्र आला तरी होणार काही नाही. देशात काहीतरी चुकीचं चाललंय हे आता कळलं पाहिजे. अमेरिका सारख्या देशात जर बॅलेट वर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजेत. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)