पुणे: अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणे, रात्री दीडनंतरही बार सुरू ठेवणे, बेकायदा मद्यसाठा करणे अशा विविध कारणांसाठी शहरातील ३२ पब, रुफटॉप हॉटेल्स आणि बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारून ते सील केले आहेत. यामध्ये चौदा पबचा समावेश असून कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या उत्पादन शुल्क यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे.कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने आलिशान कार भरधाव वेगाने चालवून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसोबत मुंढव्यातील दोन पबमध्ये पार्टी केली होती. या मुलाच्या वयाची खातरजमा न करता त्याला मद्य पुरविल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पबचा मालक, व्यवस्थापक, बार काउंटर व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवले आहे. या अपघातानंतर शहरातील पब, बारमध्ये सुरू असलेले गैरप्रकार उघड झाल्याने सरकारी यंत्रणांवर चहूबाजूने टीकेची झोड उठली.
त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य पद्धतीने पब, बार चालविणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधिक्षक चरणसिंह रजपूत आणि उप अधिक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात पब, बार, रेस्तराँकडून नियमांचे पालन होते की नाही, याच्या तपासणीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत पब, रुफटॉप हॉटेल्स व बार अशा ३२ परवानाधारकांवर विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोळा पबसह, दहा रुफटॉप हॉटेल्स आणि सहा बारवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
याशिवाय एप्रिल महिन्यापासून ५४ परवानाधरकांवर गुन्हे नोंदवून पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यापैकी एकूण ३२ परवानाधारक पब, बार, हॉटेल्स-रेस्तराँ सील करण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या सर्व ३२ परवानाधारक पब, बार आणि रुफटॉप हॉटेलचे व्यवहार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

वर्षभरात २९७ परवानाधारकांवर गुन्हे
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने २०२३-२४ या वर्षभरात एकूण २९७ परवानाधारक पब, बार, हॉटेल्स-रेस्तराँवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये एक कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर दोन परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.