विधानसभा निवडणुकीत 15 उमेदवारांचे मताधिक्य लाखाच्यावर, सर्वाधिक मतांचा विक्रम कोणाच्या नावावर?

Election Result 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालाचे कवित्व आता सुरु झाले. विजय मिळवणाऱ्यांचा जल्लोष सुरु आहे तर पराभूत होणारे ईव्हीएमवर खापर फोडत आहे. महायुतीने या निवडणुकीत विक्रम केला आहे. २३२ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यातील १५ उमेदवारांनी लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतले आहे. लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेणारे सर्वच उमदेवार महायुतीचे आहे.

महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवारास ही कामगिरी करता आली नाही. सर्वाधिक मतांचा विक्रम भाजप उमेदवाराच्या नावावर झाला आहे. शिरपूर मतदार संघातील उमेदवार काशीराम पावरा यांनी केला आहे. त्यांनी १ लाख ७८ हजार ७३ मतांनी विजय मिळवला आहे.

भाजपच्या सर्वाधिक उमेदवारांना मताधिक्य

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमदेवार एका लाखाच्या मताधिक्याने जिंकले. १५ उमेदवारांपैकी भाजपच्या आठ जणांना लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन उमेदवारास लाखाचे मताधिक्य मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवारास एका लाखाचे मताधिक्य मिळाले नाही. परंतु काही जण ९० हजाराच्या जवळपास मताधिक्य घेऊन विजयी झाले आहे.

या उमेदवारांनी केली मोठी कामगिरी

पिंपरी चिंचवड मतदार संघातून भाजप उमेदवार शंकर जगताप १ लाख ३ हजार ८६५ मतांनी विजयी झाले. ज्या परळीत पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला होता, त्या मतदार संघात पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी १ लाख ४० हजार २२४ मतांची लीड मिळाली. मेळघाटमध्ये केवलराम काळे यांना १ लाख ६ हजार २५७ मतांची लीड मिळाली. बगलानमध्ये दिलीप बोरसे यांनी १ लाख २९ हजार २९७ मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. बोरीवलीमध्ये संजय उपाध्याय यांनी १ लाख २५७ मतांनी विजय मिळवला. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांनी १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजय मिळवला. नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांनी १ लाख १५ हजार २८८ मतांचे मताधिक्य घेतले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)