शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचा इतिहास चांगला नाही. पण आता कदाचित महाराष्ट्राशीच वैर घ्यायचं असल्यामुळे ते कोणतीही भूमिका घेऊन शकतात. महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे. एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचं चित्र दिसलं, त्यांनाही अपयश आलं.
या अपयशाची कारणं शोधली पाहिजेत. ती कारणं ईव्हीएम मशीनमध्ये आहेत , यंत्रणेच्या गैरवापरात आहेत, घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत, की डीवाय चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत ? यातलं मुख्य कारण कोणतं ते शोधावं लागेल.या पराभवाला नाना पटोले, शरद पवार की ठाकरे गटाचे नेतृत्तव जबाबदार आहे का, यातून आता बाहेर पडलं पाहिजे. आम्ही तिघांनी एकत्र निवडमणुका लढल्या, काही जागांवर आमच्या भूमिका वेगळ्या असतील , हे महाविकास आघाडीचं अपयशआहे, व्यक्तीगत कोणत्याही पक्षाचं नाही. अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोलेंना पराभवास जबाबदार ठरवण्याच्या मुद्यावर स्पष्ट उत्तर दिलं.
EVM वर पुन्हा संशय
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ईव्हीएमवर पुन्हा शंका व्यक्त केली. या पराभवाचे कारण EVM मध्ये आहे का? आजही ठीकठीकाणी आमचे कार्यकर्ते EVM संदर्भात बातम्या देत आहेत. नाशिक मध्ये एका उमेदवाराच्या घरात 65 मतं आहेत, पण त्याला अवघी 4 मते मिळाली आहेत. तो एका राजकीय पक्षाचा उमेदवार आहे तरी त्याला 4 मतं मिळाली आहेत. डोंबीवलीमध्ये EVM ची मतं मॅच होत नाहीत, तिथे मतांचा आकडा मॅच होत नाही, संशयाला जागा आहे, अशा आनेक गोष्टी घडल्या आहेत. आमच्याकडे 450 तक्रारी आल्या आहेत. आम्ही आक्षेप घेऊन सुध्दा त्यावर कारवाई होत नाहीये. आहे तसाच निकाल ठेवा, बॅलेटवर निवडणुका घ्या मग पाहू असं आव्हान राऊत यांनी दिलं.
2014 पासून ठाकरें ब्राँड संपवायला मोदी शहा काम करत आहेत. फोडा झोडा राज्य करा अशी त्यांची नीती आहे. तेच एक है तो सेफ आहे अशा घोषणा देत आहेत. एक असलेल्यांना ( मविआ) तोडण्याची त्यांची नीति आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महायुती आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं.