यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 40 वा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त शरद पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार आणि निलेश लंके देखील होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रीतीसंगमावर सुरू असलेल्या भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. शरद पवार आणि रोहित पवार हे देखील काही काळ स्थिरावले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला देखील शरद पवार उपस्थित होते. वेणुताई चव्हाण हॉल या ठिकाणी छोटेखानी बैठक झाली.

मविआच्या नेत्यांसोबत शरद पवार प्रीतीसंगमावर

साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ आहे. तिथं जात शरद पवार यांनी अभिवादन केलं आहे. यावेळी श्रीनिवास पाटील, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, विकास लवांडे यांच्यासह इतर स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत होते.

शरद पवार यांची फेसबुक पोस्ट

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. आपल्या आधुनिक विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणारे, महाराष्ट्राला कृषी, शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर बनवण्यााठी बहुमोल योगदान देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!, असं शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)