थंडीत कॉफी की चहा प्यावा ? तब्येतीला दोन्ही पैकी बेस्ट काय?

थंडीत आपल्याला काही ना काही गरम खावे असे वाटत असते. थंडीत लोक जास्त चहा पित असतात. अनेक लोकांची सुरुवात सकाळी चहा घेतल्याने होत असते. तर काही जण कॉफी पित असतात. काही जण झोपण्यापूर्वी देखील चहा किंवा कॉफी पितात.भारतात चहा आणि कॉफी प्रेमींची कमी नाही. परंतू अधिक प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे आरोग्याला हानिकारक असते. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमीच वाईटच असतो.

थंडीत चहा पिण्याचे फायदे ?

थंडीत चहा प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.तुम्ही थंडीच्या काळात आलं, तुळस आणि काळी मिरी तसेच लवंग वाला चहा पिऊ शकता. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वास्तविक चहात एंटीऑक्सिडेंट सारखे तत्व आढळतात. जे शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात. आणि थंडीत रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात. जर आपण थंडीत मसाला चहा किंवा आल्याचा चहा पिला तर आपल्याला सर्दी, खोकला,ताप आणि घशाच्या खवखवण्यापासून आराम मिळतो. त्याशिवाय हर्बल आणि ग्रीन टी पचनसंस्थेला चांगले बनवितात. आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

थंडीच्या दिवसात कॉफी प्यायल्याचे फायदे –

कॉफीत असलेले कॅफीन आपल्या ताजे आणि ऊर्जादायक बनवते. थंडीची सुस्ती घालविण्यास कॉफी मदत करते. थंडीत कॉफी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढते आणि त्यामुळे थंडीत शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत मिळते.तसेच कॉफी एकाग्रता वाढविण्यास मदत करते. कॉफी एंटीऑक्सिडेंटचा चांगला सोर्स आहे.त्यामुळे आपण थंडीत कॉफी प्यायल्याने आपल्या शरीराला स्वस्थ राखण्यास मदत होते.

दोन्हीत चांगले काय ?

जर आपल्याला इम्युनिटी मजबूत करायची आहे आणि थंडी होणाऱ्या आजारांपासून वाचायचे आहे तर चहा पिणे हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. थंडीत शक्यतो हर्बल टी प्यायल्यास चांगला फायदा होतो. जर तुम्हाला ऊर्जेची गरज असेल तर किंवा कामात एकाग्रता आणायची असेल तर कॉफी फायदेशीर ठरु शकते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)