राज्यात कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट, निकालातील या गोष्टी आश्चर्यकारक

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीने मोठे यश मिळवले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी निवडणुकीत डिस्टिंक्शन मार्क्स मिळवले आहे. परंतु महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नापास झाला आहे. त्यांना ३५ टक्केही मार्क मिळाले नाही. या निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्षाचा राहिला आहे. तसेच अजित पवार यांच्या पक्षाची मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत तिप्पट वाढली आहे.

अजित पवार यांची टक्केवारी वाढली

महाराष्ट्रातील निवडणूक निकाल आश्चार्यकारक आहे. सर्वाधिक धक्कादायक निकाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे. अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. परंतु त्यांच्या मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत वाढून ९.०१ टक्के गेली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला ३.६० टक्के मते मिळाली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकीत ९.०१ टक्के मते मिळाली आहे.

अशी राहिली टक्केवारी

भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत. भाजपला २६.७७ टक्के मते मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यांना १२.३८ टक्के मिळाली आहे. काँग्रेसने १६ जागा जिंकल्या. काँग्रेसला १२.४२ टक्के मिळाली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २० जागा मिळाल्या. उद्धव सेनेला शिंदे सेनेपेक्षा कमी टक्केवारी मिळाली. त्यांना केवळ ९.९६ टक्के मते मिळाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ११.२८ टक्के मते मिळाली. त्यांनी १० जागा जिंकल्या.

कोणाचा किती स्ट्राईक रेट

निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचा राहिला. भाजपने १५२ जागा लढवल्या. त्यातील १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट ८७ टक्के राहिला. शिवसेनेने ८१ जागा लढवत ५७ जागा जिंकल्या. शिवसेनेचा स्ट्राईक रेट ७० टक्के राहिला. राष्ट्रवादीने ५२ जागा लढवत ४१ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट ७८ टक्के राहिला.

पक्ष जागा लढवल्या जागा जिंकल्या स्ट्रईक रेट (टक्के)
भाजप 152 132 87.5
शिवसेना 81 57 70.3
राष्ट्रवादी 52 41 78.85
काँग्रेस 101 16 14.85
शिवसेेना उबाठा 96 20 20.83
राष्ट्र्वादी (शरद पवार) 87 10 11.49
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)