हिवाळयात आपले आरोग्य नीट राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करत असतो. हिवाळ्यात अनेक हिरव्या पालेभाज्या बाजारात येतात अश्यात अनेक घरांमध्ये मेथीची भाजी अधिक प्रमाणात बनवली जाते. कारण मेथीची भाजी आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असते. कारण मेथीमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते, शिवाय लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, डायटरी फायबर, प्रथिने, पोटॅशियम, मॅंगनीज इ. पोषक घटकही त्यात चांगल्या प्रमाणात आढळतात. मेथी देखील गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात ती शरीराला आतून उबदार ठेवण्याचे ही काम करते. जळजळ रोखणे, खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण अशा अनेक आरोग्य समस्यांमध्येही मेथीचा फायदा होतो.
हिवाळ्यात बटाटे आणि मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाऊ शकता. मेथीच्या भाजीचे हे प्रकार खाल्ल्यानंतर तुम्हाला रोज तुमच्या आहारात समाविष्ट करण्याची इच्छा होईल. चला तर मग जाणून घेऊया मेथीच्या भाजीचे पदार्थ.
स्वादिष्ट मेथीची भाजी कशी बनवावी
मेथीबरोबर भाजीत फक्त बटाटे घातले तर त्याची चव थोडी बदलते. याकरिता भाजीची चव वाढवण्यासाठी तुम्ही पालक घालून मेथी बनवू शकता, जसे अर्धा किलो मेथीमध्ये ३०० ग्रॅम पालक घालू शकता. पालक घातल्याने मेथीच्या हिरव्या भाज्यांची चव तर वाढतेच, शिवाय त्यातील पोषक तत्वेही वाढतात. जर तुम्हाला ते आणखी चवदार बनवायचे असेल तर बनवताना थोडे भिजवलेले तांदूळ बारीक करून त्यात मिसळा.
मेथी लसूण
मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हिवाळ्यात मेथीच्या भाजीत लसूणचा समावेश करा. अशाने भाजीची चव वाढते. यासाठी प्रथम तुमच्या भाजीच्या नुसार लसूण घेऊन सोलून चिरून घ्या. कढईत एक चमचा तेल घालून त्यात थोडे जिरे आणि लसूण घालावे. त्यात चिरलेली मेथी घालून थोडा वेळ ढवळून परतून घ्या. आता एका कढईत तीळ, शेंगदाणे, घालून कोरडे भाजून घ्यावे. हे घटक पाणी घालून बारीक करून घ्यावेत. एका कढईत तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, हळद, मीठ असे आवश्यकतेनुसार लागणारे मसाले घालून शिजवून घ्या. आता त्यात मेथी घालून तीळ, शेंगदाण्याचे पेस्ट घालून शिजवा. अश्याने मेथीची भाजी चव वाढते . घरातील सर्वजण आवडीने भाजी खातील.
मेथी मटार मलाई
हिवाळ्यात तुम्ही मेथीच्या भाजीत लसणाव्यतिरिक्त मेथी मटार मलाई बनवू शकता. यासाठी मेथी स्वच्छ करून चिरून कांदा-हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. एका कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात कांदा तळून सोनेरी भाजून घ्यावा, त्यात दालचिनी, वेलची असे गरम मसाले घालावे. आता त्यात लसूण घाला आणि त्यासोबत थोडे वाटाणे, आले, काजू आणि हिरव्या मिरच्या घाला. दोन ते तीन मिनिटे तळून घ्या आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार पेस्ट दोन चमचे तेलात घालून तेल आणि मसाला वेगळा होईपर्यंत पुन्हा शिजवा. त्यात चिरलेमी मेथी घाला आणि उरलेले वाटाणे सोबत घाला. मीठ घालून अधूनमधून ढवळून भाजी शिजवा.
मेथीपुरी आणि पराठे
हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मेथीपराठे आणि पुरी देखील बनवू शकता, मेथी पराठे आणि पुरी खूप चवदार लागते. जे तुम्ही तुमच्या पद्धतीने चहा, चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. मात्र आहारात मेथीचा हेल्दी पद्धतीने समावेश करायचा असेल तर व्हेजिटेबल डिश ट्राय करणे चांगले.