Maharashtra Assembly Election Results 2024 : अजितदादांचा बारामतीत गेम होणार? पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर; राज्यात कोण कोण आघाडीवर?

राज्यातील पोस्टल मतमोजणीत धक्कादायक कल समोर येत आहे. हायप्रोफाईल लढतीत दिग्गजांना मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. सकाळी सकाळीच या दिग्गजांची चिंता वाढली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात मोठा उलटफेर दिसण्याची शक्यता समोर येत आहे. अजित पवार यांच्यावर पुतण्या युगेंद्र पवार याचा वरचष्मा दिसत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत युगेंद्र पवार याने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. अर्थात हा सुरुवातीचा कल आहे. येत्या काही तासात सर्व चित्र स्पष्ट होईल.

बारामतीत खेला होबे

बारामतीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार असा सामना आहेत. खरा सामना हा अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच होता. आता आलेल्या पोस्टल मतदानात युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बारामतीत खेला होबे होईल का, अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची ही मोठी लढाई ठरत आहे. तर बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातही शरद पवार गटाचे अनेक जण आघाडीवर असल्याने अजित पवार गटाची चिंता वाढली आहे.

सध्याचे कल काय

सध्याच्या कलानुसार राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महायुती 117 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महविकास आघाडी लवकरच 100 चा आकडा गाठणार आहे. सध्या राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. भाजपाचे 80 जागांवर विजयाचे तोरण लावणार असे दिसत आहे. तर शिंदे सेना 24 आणि अजित पवार गट 18 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 42, उद्धव ठाकरे गट 28 जागांवर तर शरद पवार गटाने 31 जागांवर मोठी आघाडी घेतली आहे.

अपक्षांचा पण दबदबा

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना दिसत असला तरी सकाळच्या पोस्टल मतांमध्ये 11 हून अधिक अपक्ष, छोट्या-मोठ्या पक्षांकडे कल वाढला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार दबदबा करतील का? अशी पण चर्चा रंगली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)