आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्या राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातून येतात. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबईला लागून असलेला ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वी शिवसेना एकसंध असताना ठाण्यावर शिवसेनेचं वर्चस्व होतं. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी मुख्य लढत आहे. ठाणेकर कोणाला आपली पसंती देतात याकडे सगळ्यांच लक्ष असेल.
लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच वर्चस्व दिसून आलं होतं. त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आला. ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेश म्हस्के निवडून आले. नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला. शिवसेनेत फूट पडली, तेव्हा ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे राहिले. अपवाद फक्त राजन विचारे यांचा. राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. पण लोकसभेला एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राजन विचारे यांचा जवळपास 2 लाख मतांनी पराभव झाला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आता ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
विधानसभा मतदारसंघ | विजयी उमेदवाराचे नाव | पक्ष |
---|---|---|
कोपरी पाचपाखडी | एकनाथ शिंदे विजयी | शिवसेना |
ठाणे | ||
मुंब्रा कळवा | जितेंद्र आव्हाड विजयी | शरद पवार गट |
ओवळा माजीवाडा | प्रतास सरनाईक विजयी | शिवसेना |
मीरा भाईंदर | नरेंद्र मेहता विजयी | भाजप |
कल्याण ग्रामीण | राजेश मोरे विजयी | शिवसेना |
डोंबिवली | रवींद्र चव्हाण विजयी | भाजप |
ऐरोली | गणेश नाईक विजयी | भाजप |
बेलापूर | ||
कल्याण पूर्व | सुलभा गायकवाड | भाजप |
उल्हासनगर | कुमार अयलानी | भाजप |
अंबरनाथ | ||
मुरबाड | ||
कल्याण पश्चिम | ||
भिवंडी पूर्व | ||
भिवंडी पश्चिम | ||
शहापूर | ||
भिवंडी ग्रामीण |
ठाण्यातील प्रतिष्ठेच्या लढती
ठाण्याातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून उभे आहेत. एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीमधून सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून विधानसभेत गेले आहेत. आता स्वत: मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. यात कळवा-मुंब्राच्या निकालावर सुद्धा लक्ष असेल. कळवा-मुंब्रामधून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड उभे आहेत. ते महायुतीवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. ऐरोलीच्या निकालाकडेही लक्ष असेल. इथून भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक रिंगणात आहेत. त्यांचे पुत्र संदीप नाईक हे शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.