kasba peth Election Result 2024 LIVE Updates: कसबा पेठेत कोणाची आघाडी? थोड्याच वेळात मतमोजणी

kasba peth Election Result 2024 LIVE Updates: पुणे शहरातील कसबा पेठेतील विधानसभेची पोटनिवडणूक मागील वर्षी राज्यभर गाजली होती. मागील वर्षी झालेली पोटनिवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांनी प्रतिष्ठेची केली होती. महायुतीने या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेनाचे संपूर्ण नेते प्रचारात लावले होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी सभा घेतल्या होत्या. त्याच वेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून एकत्रित प्रचार झाला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात काँग्रेसने सुरुंग लावले होते. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात ‘हू इज धंगेकर?’, असा प्रश्न विचारला होता. तोच मुद्दा उचलत काँग्रेसने प्रचार केला होता. पोटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर पुन्हा एकमेकांच्या विरोधात होते.

असा आहे कसबा पेठचा इतिहास

पुणे शहरातील कसबा पेठे हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. कसबा पेठ मतदार संघातून स्व.मुक्ताताई टिळक, स्व. गिरीश बापट, स्व.अण्णा जोशी, स्व.डॉ अरविंद लेले या भाजप दिग्गजांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले. 2023 मध्ये तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. भाजपच्या या मतदार संघात त्यावेळी पक्षाने ब्राम्ह्यण समाजाचा उमेदवार न दिल्यामुळे भाजपचा मतदार नाराज होता. त्यामुळे रवींद्र धगेंकर यांचा 11 हजार मतांनी विजय झाला होता. पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 73,309 मते मिळाली होती. हेमंत रासने यांना 62,394 मते मिळाली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)