North Maharashtra Election Results 2024 LIVE: मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात, उत्तर महाराष्ट्रात कोणी घेतली आघाडी

MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील निवडणुकीची चर्चा सुरु होती. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. यामुळे गेल्या 30 वर्षांचा विक्रम मोडला गेला. राज्यात जास्त झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला मिळाला? ते आज समोर येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चुरशीच्या लढती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात चार, धुळे जिल्ह्यात पाच, जळगाव जिल्ह्यात ११, नाशिक जिल्ह्यात १५ तर अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)