आश्चर्य म्हणजे इतक्या क्रूर दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या १५ तासांत जामीन मंजूर करण्यात आला. हा अल्पवयीन आरोपी सामान्य व्यक्तीचा पोरगा नसून एका बड्या घरचा शेहजादा असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालला संभाजीनगर येथून अटक केली. तर, अल्पवयीनवर दाखल केलेल्या गुन्ह्यात दारू पिऊन गाडी चालविल्याचे कलम समाविष्ट केले आहे.
विशाल अगरवालची संपत्ती किती?
विशाल अगरवाल हे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती आहेत. विशाल अगरवाल हे एक मोठे बिल्डर आहेत. एका अग्रगण्य रिअल इस्टेट विकास कंपनीशी ते संबंधित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीच्या अनेक पिढ्या बांधकाम व्यवसायात आहेत. त्यांच्या कंपनीच्या पुण्यातील वडगांव शेरी, खराडी, विमान नगर येथे मोठमोठे हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत. त्याशिवाय त्यांनी ५ स्टार हॉटेलही बांधलं आहे. विशाल अगरवाल यांची संपत्ती ६०१ कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे.
हा कोणता न्याय, मृतांचे कुटुंबीय संतापले
अश्विनी कोस्टी ही मध्य प्रदेशातील जबलपूरची होती तर अनिस अवधिया हा उमरिया जिल्ह्यातील बिरसिंहपूरच्या पाली गावचा राहणारा होता. हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. आपल्या पोरांचा अशा प्रकारे जीव घेणाऱ्याला फक्त निबंध लिहण्याची शिक्षा सुनावण्यात आल्याने कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. ‘आमच्या नातवाचा बळी घेणाऱ्या आरोपीला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन देणे हा कोणता न्याय आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया अनिसचे आजोबा यांनी दिली. तर एकुलती एक लेक गमावल्याने अश्विनीच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील आसवं थांबत नाहीयेत.