बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात वरील कोर्टात जाणार, पुणे अपघात प्रकरणी फडणवीसांची माहिती

पुणे : बालहक्क मंडळाच्या भूमिकेने खरेतर पोलिसांना जबर धक्का बसला. आरोपीला घटनेच्या २४ तासांच्या आतच जामीन दिल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही, असे सांगत बालहक्क मंडळाची ऑर्डर मंगळवारी किंवा बुधवारी आल्यावर आरोपीची रिमांड मिळेल, अशी अपेक्षा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्याचवेळी आरोपी अल्पवयीन मुलगा, मुलाचे वडील तसेत पबमधील ज्यांनी अल्पवयीन मुलाला दारू दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, असे सांगून बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.कल्याणीनगर येथे शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. आरोपी बड्या बापाचा लेक असल्याने त्याला लगोलग जामीनही मिळाला. या घटनेविरोधात जनमाणसांत तीव्र रोष आहे. गरिबांचा जीव एवढा स्वस्त झालाय का? असे प्रश्न लोक विचारत आहेत. दरम्यान घटनेची गंभीर दखल घेऊन गृहमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांकडून कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
धनाढ्य बापाचा लेक, पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, ४ सडेतोड सवाल विचारून वडेट्टीवारांची सरकारकडे मोठी मागणी

आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही

फडणवीस म्हणाले, अपघातानंतर पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बालहक्क न्याय मंडळाला दिले. पण तरीही बालहक्क न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता. या प्रकरणाला पोलिसांनी अत्यंत गंभीरतेने घेतलेले असून याप्रकरणात आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
आरोपीला सोडणार नाही; दारुचं बिल, सीसीटीव्ही फुटेज अन् ब्लड रिपोर्ट, पुणे आयुक्तांकडून कारवाईचं आश्वासन

महायुतीच्या आमदाराचा पुणे पोलिसांवर दबाव? फडणवीस म्हणाले…

महायुतीच्या आमदाराचा पुणे पोलिसांवर दबाव असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आरोपी मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्यामुळे निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झालेले आहेत त्यानुसार १६ वर्षाच्या वरील मुलांना हीनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिमांड अॅप्लिकेशनही आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे. तसेच पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही देखील तपासण्याचे आदेश मी दिलेले आहेत.

बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार

पब आणि बार भागांत ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासणार आहोत. तसेच जिथे नियमांचं उल्लंघन तिथे थेट क्लोजर ऑर्डर करण्याचे आदेशही दिलेले आहेत. पालकांनी मुलांना योग्य दिशा मिळेल,याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. पालकांविरोधात प्रथमच बालहक्क कायद्यातली तरतूद वाढवली आहे, असे सांगून बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार असल्याचे फडणवीस म्हणाले.