महाराष्ट्रात मतदान निराशाजनक, दुपारपर्यंत जेमतेम २७ टक्के नोंद, पश्चिम बंगालात ५० टक्क्यांवर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. मात्र सहा तासांत म्हणजेच दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी फारशी बरी दिसत नाही. राज्यात सरासरी अंदाजे २७.७८ टक्के मतदान झाले आहे. इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातील आकडेवारी निराशाजनक दिसते. उन्हाळा, आर्द्रतेमुळे मुंबई आणि परिसरात वाहणाऱ्या घामाच्या धारा, मे महिन्यातील लाँग वीकेंडमुळे मुंबईकरांनी धरलेली बाहेरची वाट अशा अनेक कारणांमुळे ही आकडेवारी घसरल्याचा अंदाज आहे. आणखी चार तासांचा अवधी बाकी असून ऊन ओसरताच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याणमध्ये सर्वात कमी (२२.५२ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत दिंडोरीत सर्वाधिक (३३.२५ टक्के) मतदान झाले आहे. मुंबईचा विचार करता, मुंबई दक्षिण भागात सर्वात कमी (२४.४६ टक्के), तर मुंबई ईशान्य भागात सर्वाधिक- २८.८२ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत एकूण सरासरी मतदान – २७.७८ टक्के

भिवंडी – २७.३४
धुळे – २८.७३
दिंडोरी – ३३.२५
कल्याण – २२.५२
उत्तर मुंबई – २६.७८
उत्तर मध्य मुंबई – २८.०५
ईशान्य मुंबई – २८.८२
वायव्य मुंबई – २८.४१
दक्षिण मुंबई – २४.४६
दक्षिण मध्य मुंबई – २७.२१
नाशिक – २८.५१
पालघर – ३१.०६
ठाणे – २६.०५
मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कट; यादीत नाव नसलेल्या तरुणीचा संताप, कल्याणमध्ये गोंधळ

कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

140 अंबरनाथ – 23.12 टक्के
141 उल्हासनगर – 21.56 टक्के
142 कल्याण पूर्व – 22.44 टक्के
143 डोंबिवली – 20.78 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 24.27 टक्के
149 मुंब्रा कळवा – 21.93 टक्के
Shantigiri Maharaj : जय बाबाजीच्या चिठ्ठ्या वाटल्या, शांतिगिरींचा सहकारी ताब्यात; महाराजांनी पोलिसांना विचारला जाब
इतर राज्यांशी तुलना करता, पश्चिम बंगालमध्ये तब्बल ४८.४१ टक्के मतदानाची नोंद दुपारी एक वाजेपर्यंत झाली आहे. झारखंडमध्ये ४१.८९ टक्के, तर उत्तर प्रदेशात ३९.५५ टक्के मतदान झाले आहे. तर लडाखमध्ये आतापर्यंत ५२.०२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

बिहार – ३४.६२
जम्मू काश्मीर – ३४.७९
झारखंड – ४१.८९
लडाख – ५२.०२
महाराष्ट्र – २७.७८
ओदिशा – ३५.३१
उत्तर प्रदेश – ३९.५५
पश्चिम बंगाल – ४८.४१