प्रवेश कसा घ्यायचा?
– ‘डिस्टन्स एमबीए’ला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेने सुरू केलेल्या https://sppuoa.digitaluniversity.ac/ या वेबसाइटवर जाऊन, तेथे ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करायची आहे.
– त्यानंतर प्रवेशाचा अर्ज आणि शुल्क भरून, कॉलेजमध्ये (स्टडी सेंटर) आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
– ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होईल. अर्ज आणि शुल्काची पावती स्टडी सेंटरमध्ये जमा केल्यावर विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होईल.
‘एमबीए’साठी उपलब्ध शाखा
– ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
– मार्केटिंग मॅनेजमेंट
– फायनान्शियल मॅनेजमेंट
– आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट
– प्रोजेक्ट मॅनेजमेंट
– इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट
– ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेंजमेंट
– बिझनेस अॅनालिटिक्स
शुल्क किती?
पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी १५ हजार २०५ रुपये आणि इतर विद्यापीठाच्या पदवीधरांना १६ हजार ९०० रुपये शुल्क भरावे लागेल. यामध्ये प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, सेल्फ स्टडी मटेरियल आदींचा समावेश आहे. त्यामुळे साधारणत: ६१ हजार रुपयांत ‘एमबीए’ करता येणार आहे. याच अभ्यासक्रमासाठी खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये लाखो रुपये आकारण्यात येतात. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊन, आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘ऑनलाइन एमबीए’ची लवकरच सुरुवात
पुणे विद्यापीठाकडून ‘ऑनलाइन एमबीए’चीही लवकरच सुरुवात करण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, घरबसल्या शिक्षण घेता येईल. या अभ्यासक्रमासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परवडेल इतपतच शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठातील मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.